आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत दहशतवादाला खतपाणी घालतो, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - भारतामध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले घडवून आणणा-या पाकिस्ताननेच भारतावर दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या नव्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरणाच्या मसुद्यात हा उल्लेख करण्यात आला आहे.


भारत, रशिया आणि इराणसह अनेक अमानिक देशांच्या गुप्तहेर यंत्रणा पाकिस्तानमधील दहशतवाद आणि मूलतत्त्ववादाला पाठबळ देत आहेत, असा आरोप पाकिस्तानच्या नव्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरणाच्या मसुद्यात करण्यात आला आहे. या मसुद्यात पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरत असलेल्या मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादविरोधी हल्ल्यातील आरोपींचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. या नव्या धोरणावर 12 जुलै रोजी होणा-या सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होणार आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादामुळे सुमारे 40 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 60 अब्ज रुपयांपेक्षाही (पाकिस्तानी) जास्तीचे आर्थिक नुकसान झाले.


जिहादी नेटवर्कचे सीआयएकडून बीजारोपण :
पाकिस्तानमध्ये जिहादी नेटवर्कचे बीजारोपण सीआयए या अमेरिकी गुप्तचर संस्थेने 1980 मध्ये केले होते. तेव्हा या क्षेत्रातील कम्युनिस्टांविरोधात सीआयए खलबते करत होती, असे नव्या धोरणात म्हटले आहे.


ड्रोन हल्ल्यांचा उल्लेख नाही
अमेरिकेकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळेच तालिबानला मदत मिळत असल्याचे पाकिस्तानी अधिका-यांचे म्हणणे असूनही या धोरणात ड्रोन हल्ल्यांचा उल्लेख नाही. विकिलिक्सने अनेक खळबळजनक तथ्ये समोर आणूनही या धोरणात सौदी अरब आणि आखाती देशांचाही उल्लेख नाही, असे ‘डॉन’ दैनिकाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
शरीफांची पंचतत्त्वे : विश्लेषकांच्या मते, धोरणाचा मसुदा पाहता नवाझ शरीफ सरकार पाच तत्त्वांना जास्त महत्त्व देत असल्याचे दिसते. दहशतवादी संघटनांचे विघटन, त्यांच्यावर नियंत्रण, त्यांच्यात अडथळे निर्माण करणे, त्यांना शिक्षित करणे आणि नवीन सुरुवात करणे ही ती पाच तत्त्वे आहेत. यापूर्वीचे पीपीपी सरकार विकास, संवाद आणि प्रतिबंध या धोरणावर अंमल करत होते.