आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Origin Scientist Presented French Award, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला फ्रेंच पुरस्कार प्रदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना प्रथमच त्वचासौंदर्य शास्त्रातील मानाचा पुरस्कार मिळाला आहे. फ्रेंच विद्यापीठातर्फे कर्तार लालवानी यांना त्यांच्या पहिल्या ब्यूटी टॅबलेटच्या लक्षणीय परिणामांबद्दल गौरवण्यात आले. कर्तार हे व्हिटॅबायोटिक्स या ब्रिटनमधील प्रमुख व्हिटॅमिनची निर्मिती करणा-या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
त्वचासौंदर्यशास्त्र क्षेत्रातील व्यक्तीला प्रथमच हा पुरस्कार मिळाला आहे. हिवाळ्यातील त्वचा रुक्ष होण्याच्या समस्येतून मारे्ग काढण्यासाठी मायक्रोन्यूट्रियंटच्या मदतीने त्वचा, केस आणि नखांसाठी सप्लिमेंट डॉ. कर्तार यांच्या संस्थेत निर्माण करण्यात आली. या क्षेत्रात प्रथमच एका ब्रिटिश कंपनीने यश संपादन केले आहे.