आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक चर्चेला ओबामांचा पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यातील चर्चा हे एक सकारात्मक पाऊल असून अशा प्रयत्नांना आपला पाठिंबा असल्याचे अमेरिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात दोन्ही देशांनी वाटाघाटीसाठी उचललेले सकारात्मक पाऊल उभयतांसाठी महत्त्वपूर्ण आहे, असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी सांगितले. मोदी यांच्या शपथविधी समारंभाला नवाझ शरीफ यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये 27 मे रोजी चर्चा झाली होती. भारत-अमेरिकेच्या आगामी फेरीतील चर्चेसाठी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आली नसल्याचे पास्की यांनी सांगितले. मोदींच्या दौर्‍याबाबत भारतीय अधिकार्‍यांसोबत चर्चा केली जात आहे.