आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेवर तणाव वाढला; भारताच्या २२ चौक्या, १३ गावांत पाकिस्तानचा रात्रभर गोळीबार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पाकिस्तानच्या गोळीबारामुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांनी एका शाळेत रात्र जागून काढली.)
जम्मू/इस्लामाबाद - पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत असल्याने सीमेवर तणाव वाढला आहे. सीमेवरील २२ चौक्या आणि १३ गावांत रात्रभर झालेल्या गोळीबारानंतर ही गावे रिकामी करण्यात आली आहेत. दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सनी दोन दिवस आधीच आपल्या बाजूची गावे रिकामी करून घेतली होती. अखनूर सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ५० मीटर लांबीचे भुयार आढळल्याने लष्कर सतर्क झाले आहे.

बीएसएफ आणि लष्करी जवान संपूर्ण ताकदीने पाकच्या गोळीबारास प्रत्युत्तर देत आहेत. ते राष्ट्रीय िहत आणि सीमेचे संरक्षण करण्यास सक्षम आहेत, असा िवश्वास संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, सीमेवर तणाव आहे, पण सध्या युद्धासारखी िस्थती नाही. दरम्यान, सीमेवरील तणावाचा परणिाम दोन्ही देशांच्या नात्यावर होत आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या डीजीएमओची बैठक बोलवावी आणि गोळीबार थांबवावा, अशी मागणी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी केली आहे.

पाक रेंजर्सनी २ िदवस आधीच रिकामी करून घेतली गावे
पाक लष्कराने १३ गावांना लक्ष्य केले. अनेक गावे िरकामी करून घेण्यात आली. पाक रेंजर्सनी दोन िदवस आधीच लाऊड स्पीकरवर सूचना देऊन पाकच्या सीमावर्ती भागातील गावे िरकामी करून घेतली होती. त्यामुळे परिस्थिती चिघळणार याचा अंदाज आला होता, असा दावा ग्रामस्थांनी केला.

लष्कराने बुजवले भुयार
जम्मूच्या अखनूर तालुक्यातील पल्लानवाला सेक्टरमध्ये लष्कराला एलओसीवर ५० मीटर लांबीचे भुयार आढळले. चकला भागातील हे भुयार अडीच फूट रुंद आणि तीन फूट उंच आहे. ते पाकव्याप्त काश्मीरकडे जाते. लष्कराच्या अिभयंत्यांनी भुयार बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे.