आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India PM Dr.Manmohansingh Comment On Pakistan Issue At New York

आधी ताबारेषेवर शांतता, मगच चर्चा; डॉ.मनमोहन सिंग यांनी घेतला निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी रविवारी प्रथमच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. मात्र, कोणताही तोडगा निघाला नाही. केवळ ताबारेषेवर शांतता प्रस्थापित झाल्यानंतरच सर्व मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे या वेळी ठरले.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होण्यासाठी मनमोहन सिंग व नवाज शरीफ न्यूयॉर्कला गेले आहेत. या भेटीसाठी शरीफ हे सिंग मुक्कामी असलेल्या पॅलेस हॉटेलमध्ये आले होते. या भेटीत सिंग यांनी प्रामुख्याने दोन मुद्यांना अधोरेखित केले. एक म्हणजे ताबारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन बंद व्हावे आणि दुसरा मुद्दा म्हणजे पाकिस्तानच्या भूमीचा भारतविरोधी कारवायांसाठी वापर होऊ नये. बैठकीनंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी माध्यमांशी चर्चा केली. दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल मिल्ट्री ऑपरेशन्स (डीजीएमओ) ला ताबारेषेवर शस्त्रसंधी संदर्भात नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी कोणताही कालावधी निश्चित केला नसल्याचे त्यांनी सांगितले. पण जेवढ्या लवकर याची अंमलबजावणी होईल ते अधिक चांगले असे भारतीय बाजूचे म्हणणे आहे. दरम्यान, सिंग आणि शरीफ यांनी या भेटीत एकमेकांना निमंत्रणही दिले. मात्र, त्याचीही औपचारिक तारीख ठरलेली नाही.

दहशतवाद अजेंड्यावर
चर्चेदरम्यान सिंग यांनी पाकिस्तानातून होणाºया दहशतवादी कारवायांचा मुद्दा उचलल्याचे मेनन यांनी सांगितले. तसेच 26-11 च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर न्यायिक आयोगाला भारताकडून मिळालेल्या पुराव्यांच्या जोरावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यादरम्यान लश्कर ए तोयबाच्या जमात उद दावा या संघटनेला पुरवल्या जाणाºया निधीचा मुद्दाही उचलला.