आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतच युद्धखोर असल्याचा पाकचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - सीमेवर अलीकडे वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी कठोर शब्दांत ठणकावल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. भारतच युद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याची आगपाखड त्या देशाच्या परराष्‍ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी बुधवारी केली. यामुळे उभय देशांतील शांतता चर्चेचा मार्ग धूसर होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

भारताचे नेते चिथावणीखोर विधाने करत आहेत. पाकदेखील जशास तसे उत्तर देऊ शकत होता. परंतु आम्ही सबुरी दाखवली. दक्षिण आशियाला हे युद्ध परवडणारे नाही. मुंबईवरील हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील मुश्किलीने सुरू झालेली चर्चा पुन्हा बंद पडल्यास त्याला ‘भारत कारणीभूत असेल’, असे हिना म्हणाल्या. आशिया सोसायटीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

संयुक्त राष्‍ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताने सुनावले खडे बोल
संयुक्त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताने पाकला खडे बोल सुनावले. भारताचे प्रतिनिधी हरदीप पुरी म्हणाले, देशाचे धोरणात्मक शस्त्र म्हणून दहशतवादाला वापरणारे देश अदूरदर्शी आहेत. या ‘भस्मासुरा’चा फटका त्यांनाही बसत आहे. दहशतवादावर परिषदेत चर्चा झाली. पाकच्या मंत्री हिना रब्बानी अध्यक्षस्थानी होत्या. दहशतवादविरोधात फुटकळ प्रयत्न मान्य नाहीत, असे पुरी म्हणाले.