आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात ऑस्ट्रेलिया, रशिया, फ्रान्सपेक्षा जास्त अब्जाधीश; एकट्या मुंबईत 2700

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन/ नवी दिल्ली - भारतीय अब्जाधीशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अब्जाधीशांच्या संख्येत भारताने ऑस्ट्रेलिया, रशिया आणि फ्रान्सलाही मागे टाकले आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या ताज्या आकडेवारीत 10 मिलियन डॉलर पेक्षा जास्त (साधारण 60 कोटी रुपये) संपत्ती असलेल्या अब्जाधीशांच्या यादीत भारत जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी आहे. भारताआधी अमेरिका, चीन, जर्मनी, ब्रिटन, सिंगापूर आणि कॅनडाचा क्रमांक लागतो.
भारतात 14,800 अब्जाधीश, एकट्या मुंबईत 2700
भारतात 14,800 अब्जाधीश राहातात. तर, यातील सर्वाधिक अर्थात 2700 एकट्या मुंबईत आहेत. जर्मनीच्या म्युनिख या शहरातही जवळपास एवढेच अब्जाधीश आहेत. अब्जाधीशांची सर्वाधिक संख्या असलेल्या 30 शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक अब्जाधीश (15,400) हाँगकाँगमध्ये राहातात. त्या खालोखाल न्यूयॉर्कमध्ये (14,300) लंडन (9,700), मॉस्को (7,600), लॉस एंजिलिस (7,400), सिंगापुर (6,600) शहरात सर्वाधिक अब्जाधीश राहातात.
देशांबद्दल बोलायचे झाल्यास अमेरिका (183,500), चीन (26,600), जर्मनी (25,400), ब्रिटन (21,700), जापान (21,000), स्वित्झर्लंड (18,300) आणि हाँगकाँग (15,400) अब्जाधीशांच्या क्रमवारीत वरच्या क्रमांकावर आहेत.
'करोडपतीं'च्या संख्येत 58 टक्के वाढ
गेल्या वर्षभरात कोट्यधीश आणि अब्जाधिशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. जगभरात करोडपतींची संख्या 58 टक्क्यांनी वाढली आहे. तर, अब्जाधीशांची संख्या 71 टक्क्यांनी वाढली आहे. जून 2014 च्या आकडेवारीनुसार जगात 1.3 कोटी लोक कोट्यधीश आहे, तर 4,95,000 लोक अब्जाधीश आहेत.