आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Revokes Eye Drug Patents In Blow For Western Pharma

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय औषधी कंपन्यांना अमेरिकेचा भुर्दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) येत्या ऑक्टोबरपासून जेनेरिक औषध निर्मितीच्या शुल्कात 48 टक्क्यांपर्यंत वाढ करणार असल्याने अनेक भारतीय औषध निर्मात्यांना अमेरिकेच्या बाजारपेठेत उत्पादनाची विक्री करण्यासाठी जास्तीचा आर्थिक बोजा सोसावा लागणार आहे. भारत हा अमेरिकेला औषधांची निर्यात करणारा सर्वात मोठा दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे.

एखाद्या नावीन्यपूर्ण औषधाचे पेटंट संपल्याबरोबर त्याच्या जेनेरिक आवृत्तीची अत्यंत कमी खर्चात निर्मिती करण्यात भारतीय औषध निर्मिती कंपन्या तरबेज आहेत. अमेरिकेत जेनेरिक औषधांची 30 अब्ज डॉलरची उलाढाल असून त्यात भारतीय कंपन्यांचा 10 टक्के वाटा आहे. अमेरिकेतील नियमांप्रमाणे जेनेरिक औषधांची निर्मिती करणार्‍या कंपन्यांना जेनेरिक आवृत्तीची तपासणी आणि चाचणी सुविधेचे शुल्क भरावे लागते. नव्या शुल्काशी जेनेरिक औषधी निर्मिती उद्योग जुळवून घेत असून शुल्कामध्ये शक्य तितकी कमीत कमी वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे एफडी एचे म्हणणे आहे. नवी शुल्क रचना अमेरिकी सरकारचे अधिकृत जर्नल असलेल्या फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित आली आहे. वर्षभरानंतर या शुल्काचा फेरआढावा घेतला जाणार आहे.