आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी-कॅलनबाख वस्तुसंग्रहाची खरेदी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - महात्मा गांधी यांच्या वस्तू लवकरच भारतात परतणार आहेत. गांधीजींशी संबंधित हजारो वस्तू भारतात आणण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने लिलावाचे आयोजक सुदबे कंपनीशी तसा करार केला आहे.
गांधींच्या वस्तूंच्या लिलावाची 10 जुलै ही औपचारिक तारीख आहे, परंतु याअगोदरच भारताने या वस्तू नावावर केल्या आहेत. मंत्रालयाने या वस्तूंच्या खरेदीसाठी ‘सुदबे’ला नेमके किती रुपये मोजले हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही, परंतु 4 ते 6 कोटी रुपये देण्यात आले असावेत, असा अंदाज आहे. भारतासोबत कंपनीने करार केल्यामुळे आता लिलाव केला जाणार नाही. दुसरीकडे सुदबे कंपनीनेदेखील लिलाव रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. वस्तूंची विक्री करण्यात येणार नाही. या संग्रहामध्ये असंख्य पत्रे आहेत. हा पत्रव्यवहार आर्क्टिटेक्ट हर्मन कॅलनबाख व गांधी यांच्यात झाला होता. कॅलनबाख हे गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेतील सहकारी व मित्र होते. इतिहासाचे अभ्यासक, सामाजिक संशोधक यांच्यासाठी हा संग्रह म्हणजे खजिना ठरेल. सांस्कृतिक मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने या वस्तूंचे परीक्षण अलीकडेच पूर्ण केले. या वस्तूंचे ऐतिहासिक मूल्य लक्षात घेऊन त्या अत्यंत चांगल्या प्रकारे जतन करण्यात आल्या आहेत.
दु:खी पित्याचे दर्शन : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहामध्ये या जुन्या वस्तू ठेवल्या जाऊ शकतात. कॅलनबाख व गांधी यांच्यातील मैत्रीचे दर्शन घडवतानाच या वस्तूंमधून गांधी यांच्या आत्मचरित्रावरदेखील वेगळा प्रकाश पडू शकतो. पहिला मुलगा हरिलालच्या वागण्यामुळे व्यथित झालेले गांधींचे मन एका पत्रातून सहजपणे उलगडलेले दिसते. कुटुंबातील अशा नाजूक गोष्टींवर गांधींनी कॅलनबाख यांच्याकडे आपले मन मोकळे केले आहे. याविषयीची पत्रे यात आहेत.