आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vietanam News In Marathi, Foreign Policy, Divya Marathi

भारत-व्हिएतनाम चर्चेत चीनविरोधी सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनोई - भारत व व्हिएतनामने ७ करारांवर सहमती दर्शवून त्यांवर सोमवारी शिक्कामोर्तब केले आहे. सामुद्रिक तेलक्षेत्रांवर उभय देशांनी धोरणात्मक निर्णय घेतला असून दक्षिण चीन समुद्रातील तेल िवहिरींवरील व्हिएतनामच्या हक्कांविषयी या वेळी चर्चा झाली. या तेलक्षेत्रांत हस्तक्षेप करण्यास चीनने इतर शेजारी राष्ट्रांवर सातत्याने दबाव ठेवलेला आहे. या सामुद्रिक तेलक्षेत्रावर चीनने स्वत:ची सत्ता असल्याचेच आक्रमक धोरण स्वीकारलेलेे आहे. यावर शांततेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची आग्रही भूिमका उभय देशांनी व्यक्त केली.
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या व्हिएतनामच्या चारदिवसीय दौ-यावर आहेत. उभय देशांनी राजकीय, संरक्षण, लष्करी, आर्थिक सहकार्यासाठी हातमिळवणी केली असून आशियाई देशांत सहकार्य व शांतता प्रस्थापित करण्यावर या वेळी चर्चा झाली.
पूर्व आणि दक्षणि चीन समुद्रावरील वर्चस्वावरून या प्रदेशात सातत्याने तणाव िनर्माण होतो. या सागरी हद्दींवर व तेलक्षेत्रावरील वर्चस्वासाठी संबंधित राष्ट्रांनी चर्चेतून मार्ग काढावा, यावर दोन्ही राष्ट्रांचे एकमत झाले. आंतरराष्ट्रीय कायद्यांप्रमाणे यातून तोडगा काढण्यावर चर्चेत भर देण्यात आला.
चीनच्या आक्रमक धोरणामुळे व्हिएतनाम, फिलिपाइन्स राष्ट्रांच्या सामुद्रिक वर्चस्वात हस्तक्षेप होत आहे. २००२ च्या कराराचे चीनकडून उल्लंघन होत असल्याचे मत व्हिएतनामने मांडले. उभय देशांच्या करारात ओएनजीसी विदेश लिमिटेड व व्हिएतनाम ऑइल यांतील करार, चलनविषयक, जकातीसंबंधीचे महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रुओन्ग तन्सन्ग यांनी सहकार्यािवषयी सविस्तर चर्चा केली.