आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक ‘गायक’ झुंज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद : भारत व पाकिस्तान येथील दोन टीव्ही चॅनेलच्या वतीने गायनाच्या रिअ‍ॅलिटी शोची निर्मिती करण्यात येणार असून यात दोन्ही देशातील नवोदित गायकांतील स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात भारताकडून संगीतकार हिमेश रेशमिया व पाकिस्तानकडून गायक अतिफ अस्लम याचा सहभाग आहे.
सूर क्षेत्र असे या कार्यक्रमाचे नाव असून पाकिस्तानातील जीओ टीव्ही व भारतातील सहारा टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने याची निर्मिती करण्यात येत आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, बांगलादेशच्या रुना लैला, पाकिस्तानचे परवनी हे परीक्षकाच्या भूमिकेत दिसतील. या शोची आॅडिशन 17 जानेवारी रोजी लाहोर व 18 रोजी कराची येथे आयोजित करण्यात आली आहे.