आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Working To Address Impediments To Military Modernisation, Says Pentagon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारचा लष्कराच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - नरेंद्र मोदी यांचे सरकार चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेने भारतीय संरक्षण प्रणालीतील अडचणी दूर करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. देशात लवकरच जुन्या लष्करी उपकरणांची जागा नवी अत्याधुनिक उपकरणे घेतील. शस्त्रागाराच्या नूतनीकरणाची मोदी सरकारची योजना असल्याचे निरीक्षण अमेरिकेची गुप्तहेर संस्था पेंटागॉनने केला आहे.

पेंटागॉनचे डिफेन्स इंटेलिजन्स संस्थेचे संचालक लेफ्टनंट जनरल विन्सेंट आर. स्टीवर्ट यांनी मंगळवारी अमेरिकी संसदेपुढे ही माहिती सादर केली. हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीमध्ये ‘आंतरराष्ट्रीय धोक्यांचा आढावा’ या मुद्द्यावर चर्चा झाली.

यादरम्यान स्टीवर्ट यांनी कमिटीच्या सदस्यांना भारताच्या लष्करी पातळीवरील घडामोडींशी अवगत करून दिले. भारत लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नात आहे. काही जुन्या लष्करी उपकरणांच्या जागी नवीन खरेदीची भारताची योजना आहे. त्यात बजेटसंबंधी अडचणी आहेत. त्याचबरोबर खरेदी प्रक्रियेत गुंतागुंतदेखील आहे. एवढेच नव्हे तर घरगुती पातळीवरील संरक्षण उत्पादन उद्योगाच्या क्षमतेचाही प्रश्न आहे. भारताचे पाकिस्तानसोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत. नियंत्रण रेषेवर दररोज संघर्ष असतो. काश्मीर सीमेवर २००३ नंतर गेल्या वर्षी सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला. वर्षभर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू होती. परंतु त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला नाही. भारत-चीनमध्ये लष्करी संपर्क तसा खूप कमी आहे. सीमेवर किरकोळ चकमकी होतात. सीमेवरून मात्र प्रदीर्घ वाद चालत आला आहे.

पाकिस्तान अणू हत्यारे बनवतच राहणार
पाकिस्तान आपली क्षेपणास्त्र क्षमता आणि युद्धात वापरल्या जाणार्‍या आखूड पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची क्षमता विकसित करतच राहील, असे स्टीवर्ट यांनी सांगितले. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी मोहिमेचीदेखील स्टीवर्ट यांनी सभागृहाला माहिती दिली. पेशावरमधील लष्करी शाळेवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानचे सरकार आणि लष्कराने एकत्र येऊन काम करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला दहशतवादाचा अंतर्गत पातळीवर धोका असल्याचे स्टीवर्ट यांनी म्हटले आहे. परंतु भारतातील अंतर्गत दहशतवादाला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही.

अल-कायदाचे आव्हान कायम
अमेरिकेतील संघर्षात पराभूत झालेल्या अल-कायदाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. परंतु ही संघटना गुप्तहेर संघटनांसाठी यंदाही आव्हान बनून राहील, असे स्टीवर्ट यांनी म्हटले आहे.

दोन्ही देशांमध्ये जवळीक वाढली
भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांत जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. आठ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने एनआरआय समुदायासाठी सुविधा दिल्या आहेत. अमेरिकेत ३० लाखांहून अधिक भारतीय राहतात.

आण्विक धोक्याचा सामना करण्यासाठी चिनी गस्त
पेंटागॉनच्या अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार चीनदेखील लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या शर्यतीत गुंतलेले आहे. चीनने या वर्षी आण्विक हत्यारांचा मुकाबला करण्यासाठी पहिली गस्त सुरू केली आहे. जनरल स्टीवर्ट म्हणाले, चीनने २०१४ मध्ये दोन वेळा आपली पाणबुडी हिंदी महासागरात पाठवली होती. क्षेत्र विस्ताराच्या महत्त्वाकांक्षेने सागरी भागाचा परिचय करून घेणे, अशा उद्देशाने चीनने गेल्या वर्षी पाणबुडी पाठवली होती. त्याशिवाय चीन देशी बनावटीच्या क्षेपणास्त्रसज्ज पाणबुडी निर्मितीवर देखील काम करत आहे. सध्या स्टील्थ फायटर आहेत. तिसरी चाचणी जुलै २०१४ मध्ये झाली. चीनकडे ५०-६० अण्वस्त्रे आहेत.