आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Air Force Strength Increased After Induction Of C17

‘सी-17’ मुळे भारताचे हवाई बळ वाढले, आधुनिकीकरणाचा पुढचा टप्पा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात अमेरिकी बनावटीच्या अत्याधुनिक सी-17 ग्लोबमास्टर विमानांचा समावेश झाला आहे. त्यामुळे भारताचे हवाई दल अमेरिकेनंतरचे सर्वाधिक शक्तिमान हवाई दल बनले आहे.

भारतीय हवाई दलाने (आयएएफ) गेल्या काही महिन्यांपासून आधुनिकीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत भारत-अमेरिका यांच्यात करार झाला आहे. त्यानुसार दोन विमानांचा समावेश हवाई दलामध्ये करण्यात आला. सुरक्षेला आणखी बळकट करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. सी-17 विमाने कार्गो या रशियन बनावटीच्या विमानांची जागा घेतील. अंदमान निकोबारवर या विमानाचे काम सुरू झाले आहे. उभय देशातील सामरिक मोहिमेवर या विमानांचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या विमान कंपनीने वेळेवर ते भारताकडे सोपवले आहे. त्यामुळे हवाई दलाचे प्रमुख चीफ मार्शल एन.ए.के. ब्राऊन यांनी अमेरिकेचे आभार व्यक्त केले आहेत. सी-17 प्रकारची विमाने अमेरिका आपल्या ताफ्यात वापरते. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत, कतार, यूएइ, ब्रिटन इत्यादी 12 देशांसोबत अमेरिकेचा करार असून या देशांना एकूण 33 विमाने देण्यात आली आहेत.


सी-17 ची क्षमता काय ?
प्रतिकूल वातावरणात वाहतूक करण्याची या विमानाची क्षमता सर्वात महत्त्वाची ठरते. वेगाने उड्डाण करतानाच खराब धावपट्टीवरही हे विमान सहजपणे उतरू शकते. अतिथंडी असलेला हिमालय किंवा कडक उष्णता असलेल्या वाळवंटी भागात हे विमान आपले काम करू शकते. अर्थात कोणत्याही परिस्थितीत सुरळीतपणे काम करण्याची क्षमता या विमानात आहे.


कधी झाला समावेश ?
अमेरिका व भारत यांच्यातील लष्करी विमान करारानुसार आयएएफमध्ये जून महिन्यात दहा सी-17 विमाने समाविष्ट झाली आहेत. आणखी तीन विमाने याच वर्षी दाखल होतील. त्यानंतर पुढील वर्षी पाच विमाने समाविष्ट होतील, असे सूत्रांनी सांगितले.