आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian american Astronaut Sunita Williams Celebrate Indian Independence Day At International Space Station

सुनीता विल्यम्सच्या अंतराळातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्युस्टन- अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने अंतराळात ध्वजारोहण करून भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनीताने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर भारतीय ध्वजारोहण केले. अंतराळात अशा पद्धतीने पहिल्यांदाच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
'भारत हा खूप सुंदर देश आहे आणि मी या देशाचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. 15 ऑगस्टनिमित्त भारताला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा', असा संदेशही सुनीताने अंतराळ यानातून पाठवला आहे.
माझे वडील गुजराती आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि परंपरेची मला चांगलीच जाण आहे. मला या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा भाग बनल्याचा खूप अभिमान वाटतोय. असे म्हणत सुनीता विल्यम्सने भारतीय ध्वज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताचा झेंडा फडकावला. १५ ऑगस्टचे महत्व लक्षात ठेवून सुनीताने अंतराळात झेपावण्यापूर्वीच भारतीय ध्वज आपल्यासोबत घेतला होता.
अंतराळात सुनीता विल्यम्सला ‘जोकर’ दाखवण्याची फराहची इच्छा
सुनीता विल्यम्स पोहचली अंतराळ स्थानकावर!