आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो डॉलर्सचा घोटाळा : भारतीय वंशाच्या नागरिकाला अमेरिकेत सतरा वर्षांची कैद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - लाखो डॉलर्सच्या आरोग्य घोटाळ्यात अमेरिकेतील न्यायालयाने एका भारतीय वंशाच्या नागरिकास दोषी ठरवले. औषध विक्रेते असलेल्या 50 वर्षीय बाबूभाई पटेल ऊर्फ बॉब यांना 17 वर्षांची कैदेची शिक्षा झाली आहे.

मिशिगन येथील न्यायालयाने पटेल यांना दोषी ठरवले. वेदनाशामक औषधांचे सुमारे तीन अब्ज दोन कोटी रुपयांचे बिल सरकारला पाठवल्याच्या प्रकरणात पटेल दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. बिल पाठवलेल्या औषधींचा पुरवठाच केला नसल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. पटेल यांनी ऑर्डर मिळावी म्हणून डॉक्टरांना पैसा दिल्याचाही आरोप आहे. त्यांना 2 ऑगस्ट 2011 रोजी अटक करण्यात आली होती. 17 वर्षांच्या शिक्षेव्यतिरिक्त पटेल यांनी 91.95 कोटी रुपये मेडिकेअर कार्यक्रम आणि सुमारे 7.73 कोटी रुपये ब्लूक्रॉस ब्लू शिल्ड या सरकारी कार्यक्रमांना द्यावेत, असे आदेशही न्यायालयाने बजावले आहेत. हा फार मोठा गुन्हा असून त्याबद्दल ही रक्कम नुकसानभरपाई म्हणून सरकारला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.