आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाचव्यांदा ‘स्पेलिंग बी’वर भारतीयांचे वर्चस्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - भारतीय वंशाची अमेरिकी मुलगी स्निग्धा नंदीपतीने 2012ची ‘नॅशनल स्पेलिंग बी’ ही स्पर्धा जिंकली आहे. 14 वर्षांच्या स्निग्धाने 'guetapens' हा फ्रेंच शब्द योग्य उच्चारून विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावे केली.
अमेरिकेतील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 2008पासून भारतीय वंशाच्या मुलांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. यंदा द्वितीय आणि तृतीय क्रमांक भारतीय वंशाच्या मुलांनीच पटकावले आहेत. स्पर्धेत 278 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
सॅन डिएगोत राहणारी स्निग्धाने अंतिम फेरीत फ्लोरिडाच्या स्तुती मिश्राला हरवले. न्यूयॉर्कचा अरविंद महनकाल तिस-या क्रमांकावर राहिला. अभ्यासाशिवाय स्निग्धाला व्हायोलिन वादनाची आणि जुन्या नाण्यांचा संग्रह करण्याचा छंद आहे. सायन्स ऑलिम्पियाडमध्ये तिने अनेक पदके जिंकली आहेत. स्निग्धाला मनोचिकित्सक वा न्यूरोसर्जन व्हायचे आहे. ती म्हणते, मला त्या शब्दाचे स्पेलिंग माहीत होते. मात्र, मी ही स्पर्धा जिंकलेय, याचा मला आताही विश्वास बसत नाही.
काय आहे स्पेलिंग बी स्पर्धा
1925मध्ये स्पर्धेची सुरुवात झाली होती. तेव्हापासून दरवर्षी वॉशिंग्टनमध्ये ही स्पर्धा भरवण्यात येते. यात अमेरिका आणि युरोपियन देशांतील मुलांसह कॅनडा, न्यूझीलंड, गुआम, जमैका आणि प्युअर्तोरिकातून मुले आपला
सहभाग नोंदवतात.
भारतीय मुलांचा दबदबा
1985मध्ये बालू नटराजन या भारतीय वंशाच्या मुलाने स्पर्धा जिंकली होती. तेव्हापासून आतापर्यंत 11 भारतीयांनी ही स्पर्धा जिंकली आहे. गेल्या 14 स्पर्धांत 10 भारतीय मुलांनी ही स्पर्धा जिंकली आहे.

काय काय मिळाले
ट्रॉफी आणि 30 हजार डॉलर्स (सुमारे 10.68 लाख रुपये)
2500 डॉलर्सचे बचतपत्रे
5000 डॉलर्सची शिष्यवृत्ती
2600 डॉलर्स एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, ऑनलाइन लँग्वेज कोर्ससाठी