आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Americans Begin Preparations To Campaign For Lok Sabha Polls

लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भारतीय वंशाचे अमेरिकी जुंपले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - भारताची टप्प्यात आलेली लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरवत अनेक भारतीय अमेरिकी नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी तयारी चालवली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीचा लाभ त्यासाठी उठवला जात आहे. यातील काही जण भाजप व आम आदमी पार्टी व कॉँग्रेसकडून तिकीट मिळवण्याचाही प्रयत्न करत आहेत. भाजप आणि आप समर्थकांनी प्रचारासाठी फौज उभी केली आहे. दोन्ही पक्षांचे समर्थक भारतीयांना मतदानासाठी प्रोत्साहन देत आहेत.

भाजप आणि आपचे शेकडो समर्थक प्रचाराच्या काळात भारतात येणार आहेत. या पक्षांचे हजारो समर्थक आपल्या मित्रांना मतदानास भारतात येण्यासाठी संपर्क साधणार आहेत. ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी(ओएफबीजेपी)-अमेरिका आणि आप-अमेरिकेच्या समर्थकांनी आपापल्या पक्षांसाठी प्रचार सुरू केला आहे. दोन्ही संघटनांनी निधी संकलन व दूरध्वनीवरून प्रचार सुरू केला आहे. आगामी सार्वजनिक निवडणूक ऐतिहासिक असल्यामुळे आम्हा भारतीय अमेरिकींनी त्यात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे, असे मत ओएफबीजेपी-अमेरिकेचे अध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी व्यक्त केले. भाजप आणि नरेंद मोदी यांचे समर्थक सोशल मीडिया आणि दूरध्वनीवरून प्रचार करतील. त्यासाठी हजारो नागरिक पुढे येत असून यामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. अनिवासी भारतीयांच्या आवाहनाचा बराच प्रभाव पडतो, असे ते म्हणाले.

आपला पक्ष एनआरआयशी गुगल हॅँगआऊट्सद्वारे नियमित संपर्कात असल्याचे आप-अमेरिकेचे नेते प्राण कुरूप यांनी सांगितले. दिल्ली विधानसभेच्या यशानंतर आप समर्थक निवडणूक प्रचारासाठी लोकसभा मतदारसंघ दत्तक घेण्याच्या विचारात आहेत. अमेरिकेतील बर्‍याच शहरामध्ये प्रचारासाठी स्वयंसेवकांचे गट तयार करण्यात आले आहेत.

मतदारांत पाच पट वाढ
1951-52 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सोळाव्या लोकसभेला सामोरे जाताना मतदारांच्या संख्येत तब्बल 5 पट वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत पहिल्या लोकसभेसाठी एकूण 17.3212343 कोटी मतदार होते, तर आगामी निवडणुकीसाठी ही संख्या 81.4591184 कोटी मतदार आहेत. मतदारांतील ही वाढ 4.7 टक्के आहे. 2009 च्या निवडणुकीत 71.6985101 कोटी मतदार होते. पाच वर्षांत 9.7606083 मतदार वाढले.