आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Anxisty : American MP Supporting Khalistani Movement

भारताची चिंता : खलिस्तानवादी चळवळीला अमेरिकन खासदारांचे बळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - खलिस्तानवादी चळवळीच्या समर्थक समुदायाने अमेरिकेतील संसद सदस्यांसोबत जवळीक वाढवली आहे. खलिस्तानवाद्यांना काही अमेरिकी खासदारांकडून मिळणा-या पाठिंब्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
गेल्या आठवड्यात खलिस्तानवादी विचाराच्या समुदायाची कॅपिटॉल हिल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात अमेरिकेचे दोन डझन संसद सदस्यही सहभागी झाले होते. त्यावरून खलिस्तानवाद्यांना संसद सदस्यांचे बळ मिळाल्याचे उघड झाले आहे. बैठकीत खलिस्तानची जाहीरपणे मागणी करण्यात आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. शीख समुदायाच्या सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी खलिस्तानवादी विचारांचे जोरदारपणे समर्थन केले, अशी माहिती कॅलिफोर्निया येथील नॉर्थ अमेरिका पंजाबी असोसिएशनचे (एनएपीए) अध्यक्ष दलविंदर सिंग धूत यांनी दिली. नवीन गटाची स्थापना झाली असली तरी त्याचा भारताविरुद्ध वापर होणार नाही, याची खात्री काँग्रेस सदस्यांकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर भारत-अमेरिकेच्या राजनैतिक संबंधाचे आम्हाला महत्त्व असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


मरणासन्न चळवळीचे पुन्हा पुनरुज्जीवन करण्याची धडपड
प्रतिष्ठितांना वगळले
अमेरिकी शीख समुदायातील काही लोकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या गटाच्या पहिल्या कार्यक्रमापासून प्रतिष्ठित शीख बांधवांना दूर ठेवण्यात आले होते. एनएपीएसह अनेक संघटनांना सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, हे स्पष्ट झाले आहे. हा कार्यक्रम 24 एप्रिल रोजी झाला होता. भारताकडून ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट असलेले किंवा राजदूत कार्यालयासमोर स्वतंत्र खलिस्तानसाठी निदर्शने करणा-ºयांची बैठकीत हजेरी होती.


धक्कादायक
अमेरिकी संसद सदस्य आणि खलिस्तानवाद्यांतील जवळीक भारताला मित्र मानणा--ºया अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे. भारतीय राजदूत कार्यालयदेखील याबद्दल अनभिज्ञ आहे. राजदूत कार्यालयातील कोणताही प्रतिनिधी या गटात सहभागी करून घेण्यात आलेला नाही. त्यावरून गटाचे मनसुबे स्पष्ट होऊ लागले आहेत.
गूढ हालचाली मोठ्या संख्येने असलेल्या शीख समुदायाला या गटापासून का दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार गूढ वाटतो. सतनामसिंग चहल, प्रवक्ता, एनएपीए.


उद्देश काय ?
शीख समुदायाचा एक वेगळा गट स्थापन करण्यामागील मुख्य कारण हेट क्राइम विरुद्ध लढणे असा आहे, असा दावा डेमोक्रॅटिक पार्टीच्या संसद सदस्या ज्यूडी च्यू यांनी केला आहे. 9/ 11 नंतर शीख समुदायाविरुद्धच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही स्थापना करण्यात आली आहे. गटाच्या पदाधिकारी असलेल्या ज्यूडी यांनी गेल्या आठवड्यात त्याचा उद्देश स्पष्ट केला होता. स्थापनेचा वेगळा अर्थ काढू नका. गटाच्या माध्यमातून देशांतर्गत समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.


गटावर लक्ष
नवीन गटावर आमचे लक्ष आहे. त्यांच्यासोबत आम्ही हेट क्राइमसारख्या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक आहोत. त्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य करण्याचीही तयारी आहे. त्यातून अमेरिका-भारत संबंधाला बळकटी मिळेल.
एम. श्रीधरन, प्रवक्ता, भारतीय राजदूत कार्यालय.
28 अमेरिकी खासदार खलिस्तानवादी गटाचे संस्थापक सदस्य


डिप्लोमॅटिक व्हिक्टरी
खलिस्तानवादी गटाची स्थापना करण्यात यश आल्याने भारताच्या विरोधात दीर्घ काळानंतर कूटनीतीच्या पातळीवर विजय मिळाल्याचे मत समारंभातील सहभागी नागरिकांनी व्यक्त केले आहे.