आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Army To Get Us Rifles That Killed Osama Bin Laden ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लादेनचा खात्मा करणारी बंदूक भारतीय जवानांच्या हाती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अलकायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी अमेरिकन नौदलाच्या जवानांनी वापरलेली एम-4 असॉल्ट रायफल आता भारतीय जवानांच्या हाती दिली जाणार आहे. भारतीय जवानांच्या दहशतवादविरोधी बटालिनला अशा प्रकारची बंदूक दिली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम-4 कार्बाइन रायफल खरेदी करण्यासाठी भारताने अमेरिकेसोबत कोट्यवधी रुपयांचा करार केला आहे. इराक आणि अफगाणिस्तानातील व्यापक मोहिमेत अमेरिकेतर्फे याच शस्त्रांचा वापर केला जातो. ही शस्त्रे आता भारतीय सैन्यदलात समाविष्ट करून घेतली जाणार आहेत.
भारतीय सैन्यदलात सध्या इस्रायली टॅवोर -21, उजी
आणि मिनी उजी या बंदुका वापरल्या जातात. नव्याने मागवण्यात आलेल्या बंदुकांमुळे शस्त्रास्त्र भांडारात भर पडणार आहे. टॅवोर -21 रायफल्स काही वर्षांपूर्वीच शस्त्रभांडारात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याआधी एके -47 रायफलचा वापर केला जात होता.
भारतीय सैन्यातील विशेष दलांच्या क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये दहा बटालियन आहेत. यापैकी आठ बटालियन्सना विशेष दलाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष दलातील जवानांची संख्या वाढवण्यावर सध्या भर दिला जात आहे. प्रत्येक बटालियनमध्ये 700 जवान असावेत, अशी अपेक्षा आहे.