आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय केळांना पाकमध्ये मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- भारतीय केळांसाठी पाकिस्तानात मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. पाकिस्तानातील केळांच्या उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे भारतीय केळांची मागणी वाढली असून 200 डझन एवढ्या चढ्या दराने विकले जात आहेत.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात केळांची सर्वाधिक लागवड होत असते.मात्र गेल्या दोन वर्षात महापूर आणि प्रचंड गारव्यामुळे सिंध प्रांतात केळी उत्पादनावर विपरित परिणाम झाला.त्यामुळे भारतीय केळांना मागणी वाढली. सुरुवातीला केवळ पंजाब प्रांतामध्येच आयात केली जात होती परंतु भारतीय केळांचा दर्जा आणि चव पाकिस्तानपेक्षा सरस असल्याने हळूहळू मागणी वाढली. इस्लामाबादेतील भाजीपाला,फळं विक्रेत्या दुकानदारांच्या मते पाकिस्तानी केळांच्या तुलनेत भारतातून आयात होणारी केळी मोठी,दर्जेदार आणि चवीला उत्कृष्ट असतात.त्यामुळे ग्राहकांचा ओढा भारतीय केळींकडेच जास्त आहे. गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील केळीचे उत्पादन 40 हजार टनाने घटले होते. सन 2011-12 तीलआर्थिक सर्वेक्षणानुसार सन 2010-11 या कालावधीत पाकिस्तानात 1,39,000 टन केळीचे उत्पादन झाले.तर 2011-12 यावर्षात हे उत्पादन घसरून 99 हजार टनावर आले. पाकिस्तानी फळ आणि भाजीपाला आयात-निर्यात संघटनेचे सहअध्यक्ष वाहीद अहमद यांनी सांगितले की, केळींसोबतच काही विशिष्ट जातीचे आंबे आणि द्राक्षही आयात करण्यात आली पण त्याला हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही.

दर घसरले
रुपये डझन एवढा अशा महागड्या दरामध्ये इस्लामाबादेत भारतीय केळी विकली जात होती. परंतु आवक वाढल्यामुळे हा भाव आता 180 ते 200 डझन एवढा कमी झाला आहे.कराचीमध्येही 150 ते 200 रुपये दराने भारतीय केळांची विक्री हो असून डझनामागे 40 ते 60 रुपयांपर्यंतीची बक्कळ कमाई व्यापारी करीत आहेत. पाकिस्तानी केळं मात्र 70 ते 80 रुपये डझन भावाने विकली जात आहेत.