आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- शरीरावर पुरुषांप्रमाणे केस असल्यामुळे ब्रिटनमध्ये भारतीय वंशाची 23 वर्षीय तरुणी चर्चेचा विषय बनली आहे. हरनाम कौर असे या पीडित तरुणीचे नाव आहे. हरनामच्या चेहर्यावर पुरुषांप्रमाणे दाढी-मिशी आहे. हरनामला असलेला आजार डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान ठरले आहे.
'बर्कशर' येथील रहिवासी हरनाम कौर ही 'पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम'ने पीडित आहे. हा आजार जडलेल्या तरुणींच्या शरीरावर मोठ्याप्रमाणात केस उगतात. हरनाम अवघ्या 11 वर्षांची होती. तेव्हापासून तिच्या चेहर्यावर दाढी दिसू लागली होती. त्यानंतर पुरुषांप्रमाणे तिच्या छाती आणि हातापायांवर केस पसरले.
हरनाम कौरच्या चेहर्यावर दाढी-मिशी असल्यामुळे मादकता आणि सौंदर्यात भर पडली आहे. चेहर्यावरील केस कापण्याचा विचार तिच्या मनात कधीच आला नसल्याचेही हरनाम कौर सांगते.
हरनाम डोक्यावर पगडी बांधते. सार्वजनिक ठिकाणी ती सहज वावरते. ती तरुणी असल्याचे कोणाच्याच लक्षात येत नाही. हरनाम ही स्त्री असल्याचे मोजक्याच लोकांना माहीत आहे.
हरनाम म्हणाली, चेहर्यावर आलेल्या नैसर्गिक दाढी-मिशीमुळे शाळेतील मुले-मुली तिची टिंगल उडवत होते. मात्र, ती खचली नाही. तिने दाढी-मिशी वाढवण्याचा निश्चय पक्का केला. यापूर्वी हरनाम आठवड्यातून दोनता 'वेक्सिंग' करत होती. मात्र, आता तिने वेक्सिंग करणेही सोडून दिले आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत पॉलिसिस्टिक ओव्हरीजची समस्या घेऊन येणार्या तरुणी आणि स्त्रियांच्या संख्येत खूपच वाढ झाली आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि इतर शाखांचे डॉक्टरही यावर गांभीर्याने विचार करायला लागले आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, फ्रान्समध्ये महिलांचे दाढी-मिशी लावून आंदोलन...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.