आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमधील अब्जाधिशांमध्ये आहे भारतीयांचा रूबाब, वाचा कसा कमावला एवढा पैसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरून कंपीनीने ब्रिटिनमधील अब्जाधिशांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. पन्नास अब्जाधिशांच्या या यादीत पाच भारतीयांचा समावेश आहे. या भारतीयांनी ब्रिटनमध्ये राहून एवढा पैसा कसा कमावला हे आज आम्ही सांगत आहोत.

लक्ष्मीनिवास मित्तल
rank-2

राजस्थानमधील राजगढमध्ये जन्म झालेले लक्ष्मीनिवास मित्तल हे या यादीत दूस-या क्रमांकावर आहेत. स्टील किंग नावाने ओळखल्या जाणा-या मित्तल यांची कंपनी जगात सर्वात जास्त स्टिलची निर्मिती करते. जगातील प्रत्येकी पाच कारमागे एका कारमध्ये मित्तल यांचे स्टिल वापरले जाते. 1976 मध्ये स्टिलची फॅक्ट्री सुरू करणा-या मित्तल यांचा व्यवसाय आज जगभरात पसरला आहे.

जवळपास एक हजार अब्ज संपत्ती असणा-या मित्तल यांनी स्कॉटलँडमध्य़े सर्वात महागडे घर बांधले आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी 350 कोटी खर्च केला होता. संगीत आणि साहित्यावर आधारीत एका कार्यक्रमासाठी मित्तल यांनी 7.8 कोटींपेक्षाही जास्त खर्च केला होता. मित्तल यांनी समाजसेवेसाठी कोटींची मदत केलेली आहे. ते खेळ, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करतात.

नोट: 106 अब्ज संपत्तीचे मालक असणा-या अनिल अग्रवाल यांना हुरून कंपनीने ब्रिटिनमधील 27 वे श्रीमंत सांगितले आहेत तर 101 अब्ज संपत्ती असणा-या अन्वर परवेज यांना 43 वा क्रमांक दिला आहे. या दोन्ही व्यक्तींचा जन्म भारतात झाला आहे.


अशाच अब्जधिशांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...