आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Billionairs News In Marathi, Divya Marathi, RBC Wealth Mangement, Landon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतामध्‍ये राहतात 1.56 लाख कोट्यधीश व्यक्ती, तीन हजारांनी वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - गेल्या वर्षभरात भारतात कोट्यधीशांची संख्या तीन हजारांनी वाढून 1.56 लाख झाली आहे. आता भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
कॅपजेमिनी व आरबीसी वेल्थ मॅनेजमेंटने जारी केलेल्या 2014 च्या जागतिक संपत्ती अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानुसार 2014 मध्ये भारतात कोट्यधीश व्यक्तींची संख्या 1 लाख 53 हजार इतकी होती. 2013 मध्ये ती तीन हजारांनी वाढून 1 लाख 56 हजारांवर पोहोचली आहे.

गेल्या वर्षात जगभरातील कोट्यधीशांचा आकडा 17.6 कोटींवर गेला आहे. त्यांच्याकडील एकूण मालमत्ता 15 टक्क्यांनी वाढून 52,630 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे.
आरबीसी वेल्थ मॅनेजमेंट आणि आरबीसी विमा कंपनीने समूहप्रमुख एम. जॉर्ज लेविस यांनी सांगितले की, रोखे बाजारातील तेजी आणि सुधारत असलेल्या अर्थव्यवस्थेमुळे लोकसंख्या व संपत्तीच्या पातळीत दुहेरी वाढ झाली. यामुळे सर्व श्रीमंतासाठी 2013 हे वर्ष चांगलेच फायद्याचे ठरले आहे.

दीर्घमुदतीच्या विकास दर कलाकडे पाहता गेल्या पाचच वर्षात एचएनडब्ल्यूआयमध्ये 40 टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. यामुळे 2016 पर्यंत अतिरिक्त 12 लाख कोटी डॉलर्सची वाढ होण्याची आशा आहे. 2016 पर्यंत जागतिक एचएनडब्ल्यूआयचा आकडा 64,300 अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. म्हणजेच त्यात 2013 च्या तुलनेत 22 टक्क्यांची वाढ होण्याची आशा आहे.