आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cinema News In Marathi, United Nations, Divya Marathi

भारतीय चित्रपटात दिवसेंदिवस वाढतोय ओंगळपणा, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात शेरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - भारतीय चित्रपटातून स्त्रीची सर्वाधिक भडक प्रतिमा पाहायला मिळते, असा शेरा संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालातून मारण्यात आला आहे. जगभरातील चित्रपटांचा अभ्यास केल्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्थेने एक यादी तयार केली आहे. त्यात भारताचे स्थान आघाडीवर आहे.

मुख्य प्रवाहातील चित्रपटातून दाखवण्यात येणारी स्त्री प्रतिमा नेमकी कशी आहे. हे पाहण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. गीना डेव्हिस इन्स्टिट्यूटच्या वतीने त्याचे प्रत्यक्ष विश्लेषण करण्यात आले. संशोधनामध्ये द रॉकफिलर फाउंडेशननेही सहभाग नोंदवला होता. भारतीय चित्रपटातील भडक स्त्री प्रतिमेचे प्रमाण कमालीचे जास्त असल्याचे दिसून आले आहे. वास्तविक जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्मी संख्या महिलांची आहे.

त्याचबरोबर रुपेरी पडद्यावरदेखील एकूण कलाकारांपैकी सरासरी एक तृतीयांशपेक्षा कमी एवढे प्रमाण महिला कलाकारांचे दिसून येते. महिलांबाबत चित्रपट उद्योगात कमालीचा भेदभाव होत असल्याचेही यातून उजेडात आले आहे. विशिष्ट भूमिका नेहमी पुरुषांच्या वाट्याला येते. महिलांना राजकीय व्यक्तिरेखा, उद्योग जगतातील उच्चाधिकारी, तंत्रज्ञ किंवा इतर व्यक्तिरेखापासून डावलले जाते.

निर्लज्जपणात जर्मनी अव्वल
चित्रपटात स्त्री कलाकारांचा उपभोग्य वस्तूसारखा वापर करण्यात जर्मनीने अव्वल स्थान पटकावले आहे. अशा निर्लज्जपणात ऑस्ट्रेलिया दुस-या स्थानी आहे. दोन्ही देशांतील चित्रपटातून उपभोगाची वस्तू म्हणून स्त्री कलाकारांचा वावर आढळून येत असल्याचे निरीक्षण या अभ्यासातून नोंदवण्यात आले आहे. दोन्ही देशानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतीय चित्रपटातून अंगप्रदर्शन करणा-या कलाकारांचे प्रमाण ३५ टक्के दिसते.

२३.६ टक्के अमेरिकी-चित्रपटातील महिला पात्रांचे प्रमाण.
२४.९ टक्के भारतीय चित्रपटात विविध स्त्री व्यक्तिरेखा.

दिग्दर्शिकांची संख्या जास्त
जगाच्या तुलनेत भारतात ९.१ टक्के महिला दिग्दर्शिका आहेत. जगभरात हे प्रमाण सरासरी ७ टक्के दिसते. महिला लेखिकांचे प्रमाणही १२.१ टक्के आहे. जगाच्या (१९.१ टक्के ) तुलनेने मात्र हे प्रमाण कमी आहे. जगातील विविध देशात महिला निर्मात्यांची संख्या सरासरी २२.७ टक्के आहे. भारतात १५.२ टक्के महिला निर्मात्या आहेत, असा दावा करण्यात आला.