आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Consulate Attacked In Afghanistan\'s Herat

हमिद करझाई यांच्या भारत दौऱ्यापूर्वी भारतीय दूतावासावर जोरदार हल्ला, 4 दहशतवादी ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल (अफगाणिस्तान)- हेरात शहरातील भारतीय दूतावासावर आज (शुक्रवार) पहाटे काही दहशतवाद्यांनी हल्ला करून जोरदार गोळीबार केला. यावेळी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले. तरीही दोन दहशतवादी शेजारच्या इमारतीवरून गोळीबार करीत होते. त्यांनाही लष्कराचा जवानांनी ठार मारल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अणगाणिस्तानमधील भारतीय राजदूत अमर सिन्हा यांच्यासोबत दूरध्वनीवर संवाद साधून आवश्यक मदतीचे आश्वासन दिले.
स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी हल्ला झाला. त्यानंतर दूतावासाच्या सुरक्षेसाठी असलेले आयटीबीपीचे जवान आणि अफगाणिस्तान पोलिसांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. यावेळी एका कारमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात आले असून त्यात काही व्यक्ती जखमी झाल्याचे समजते.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दहशतवादी हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. या दूतावासाजवळ असलेल्या इमारतीतून दहशतवादी गोळीबार करीत होते, असे स्थानिक वृत्तवाहिनीने सांगितले आहे.
भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभापूर्वी हा दहशतवादी हल्ला झाला आहे. हमिद करझाई यांना या शपथविधीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे हेरात हे शहर अत्यंत सुरक्षित समजले जाते. इराण सीमेजवळ असल्याने या प्रांतावर इराणचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे बऱ्याच देशांचे या शहरात दूतावास आहेत.