आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संस्कृतीला दक्षिण आफ्रिकेत स्वीकृती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेतील नागरिक झपाट्याने हिंदू संस्कृतीशी समरस होऊ लागले असून हिंदूंना धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी ऐतिहासिक स्थळे खुली करून देऊ लागले आहेत. इतर समाज घटक हिंदू सांस्कृतिक कार्यक्रमांकडे आकृष्ट होत असून माजी राष्ट्राध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला यांना अपेक्षित असलेली ‘सप्तरंगी राष्ट्रा’ची संकल्पना प्रत्यक्षात साकारत असल्याचेच हे द्योतक आहे, असे दक्षिण आफ्रिका हिंदू महासभेच्या गौटेंग विभागाचे अध्यक्ष सिंथल रमैय्या यांनी म्हटले आहे.

पूर्वी त्यांच्या परिसरात मंदिर किंवा मशीद बांधण्यास विरोध करणारे काही गोरेही हिंदू संस्कृती काय आहे हे लक्षात आल्यानंतर आता मंदिर बांधणीसाठी अनुकूल झाले आहेत. नवरात्री आणि अन्य धार्मिक सण साजरे करण्यासाठी हिंदूंना शाळा आणि तत्सम इमारतींची मैदाने खुली करून देण्यात येत आहेत.


दक्षिण आफ्रिकेत पहिलाच नवरात्रोत्सव
सनातन शक्ती नावाच्या नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या हिंदू संघटनेने दक्षिण आफ्रिकेतील पहिला नवरात्रोत्सव गौटेंग प्रांतात आयोजित केला असून तेथे गेल्या काही दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.