आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वॉशिंग्टन - भारताचे धोरण विकासाभिमुख आहे. त्यामुळे अमेरिकी गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी येथे केले. भारत-अमेरिकी व्यापार मंडळाच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी चिदंबरम येथे आले आहेत. त्यांनी अमेरिकी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह सिनेटच्या वित्त समितीचे अध्यक्ष मॅक्स ब्यूकस यांची भेट घेतली.
विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत झालेल्या बैठकीत चिदंबरम म्हणाले की, भारताची बळकट अर्थव्यवस्था असणे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. मायक्रोसॉफ्ट, लॉकहीड मार्टिन, बोइंग आणि इंटरनॅशनल लीज फायनान्स कॉर्पोरेशन (आयएलएफसी) या कंपन्यांचे अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते. निर्धारित मूल्य हस्तांतरण, स्थलांतरित रहिवाशांसंबंधित मंजूर विधेयकामुळे अमेरिकेत कार्यरत भारतीय आयटी कंपन्यांवर होणारे आर्थिक परिणाम आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. भारतीय धोरण भेदभावपूर्ण असल्याचा आरोप करत 250 अमेरिकी संसद सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.