आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Embassy Gets 15000 Passports Of Workers Stranded In Saudi

सौदीत अडकलेल्या भारतीयांची सुटका होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - सौदी अरबमध्ये अडकलेल्या 1500 भारतीय नागरिकांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून त्यांचे पासपोर्ट रियाध येथील भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याविरुद्ध इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन केल्याची प्रकरणेही निकाली निघण्याची शक्यता आहे. या कर्मचार्‍यांच्या मालकांनी हे पासपोर्ट ठेवून घेतले होते.

भारतीय मिशनचे उपमुख्याधिकारी सीबी जॉर्ज यांनी सांगितले की, बहुतांश मालकांनी सौदी अधिकार्‍यांकडे पासपोर्ट दिले आहेत. यातील अनेक भारतीयांकडे पासपोर्ट नसल्याने ते तुरुंगात आहेत. पासपोर्ट मिळाल्यानंतर त्यांना तुरुंगातून सोडवण्यास मदत होईल. भारतीय दूतावासाने सर्व पासपोर्टची यादी वेबसाइटवर अपलोड केली आहे. त्यात म्हटले आहे की, जे लोक या पासपोर्टची फोटोकॉपी घेऊन येतील त्यांनाच हे पासपोर्ट दिले जातील. विशेष म्हणजे सौदी अरबमध्ये निताकत कायद्यामुळे अनेक भारतीयांच्या नोकर्‍यांवर गदा आली आहे. या कायद्यानुसार बाहेरून येणार्‍या दहा कामगारांमागे सौदीच्या एका नागरिकास नोकरी देणे बंधनकारक आहे.