आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Environmentalist Bankar Roy Awarded Clinton Globe

भारताचे पर्यावरणवादी बंकर रॉय यांना अमेरिकेचा क्लिंटन ग्लोबल पुरस्कार जाहीर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - भारताचे पर्यावरणवादी बंकर रॉय व पाकिस्तानची किशोरवयीन सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझाई यांना यंदाचा क्लिंटन ग्लोबल सिटीझन अ‍ॅवार्ड जाहीर झाला आहे. अमेरिकेतील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. रॉय हे बेअरफूट कॉलेजचे संस्थापक आहेत. त्यांनी ग्रामीण समुदायामध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून पर्यावरणाची चळवळ राबवली आहे. बेअरफूटच्या कार्यामुळे परिसरात दहा लाख लिटर पावसाच्या पाण्याचे सिंचन घडवून आणण्यात यश आले आहे. त्याशिवाय त्यांनी 2 लाख 39 हजार शालेय विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी देखील पुरवले आहे. त्यात जगभरातील 1 हजार 300 समुदायांचा समावेश आहे. जगातील पन्नास पर्यावरणवाद्यांमधून रॉय यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन गार्डियनने त्यांचा जगातील 100 शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला होता. सोळा वर्षांच्या युसूफझाईवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.