मेलबर्न - ऑस्ट्रेलियामध्ये एका भारतीय उद्योजक आणि त्याचे कुटूंब वर्णद्वेषी हल्ल्याचे बळी ठरले आहे. काही लोकांनी वर्णद्वेषी शिवीगाळ केली आणि आमच्यावर थुंकले असा, आरोप या भारतीय कुटूंबाने केला आहे. आमच्या बचावासाठी काही लोक पुढे आले असताना आरोपींनी त्यांना मारहाण केली. वर्णद्वेषी हल्ला हा ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या क्वीन्सलँड राज्याच्या इप्सविचभागात राहणा-या राज शर्मा आणि त्यांच्या कुटूंबावर झाला.
निंदाजनक वर्तवणूक
शर्मा इप्सविच भागात इंडियन मैफिल नावाचे रेस्तरॉं चालवतात. रेस्तरॉंच्या बाहेर दोन अज्ञात इसमांनी माझ्यावर आणि कुटूंबावर हल्ला केला. तीन लोक सेंट पॉल चर्चच्या जवळ असलेल्या टेकडीवर बसले होते. त्यांनी इंडियन मैफिलच्या बाहेर बसलेल्या माझ्या कुटूंबावर वर्णद्वेषी भाषा वापरण्यास सुरूवात केली. यानंतर माझी पत्नी आणि मुले यांना मी आत घेऊन गेलो व पोलिसांना बोलवले. दरम्यान, टेकडीवर बसलेल्या गटातील एक इसम रेस्तरॉंमध्ये आला आणि तो मोठ्या आवाजात शिवीगाळ करू लागला. त्यानंतर कुटूंबातील सदस्यांवर थुंकला.
एक आरोपी अटकेत
इप्सविच सिटी काउन्सिल सेफ सिटी प्रोग्रॅम आणि पोलिस सूत्रांनुसार हल्ला करणा-या दोन संशयितांची ओळख पटली आहे. यातील एकाला अटक करण्यात आली आहे. वर्णद्वेषी हल्ला कदापि सहन केला जाणार नाही, असे इप्सविच काउन्सिलर अँड्र्यू अँटोनियोलीनी यांनी सांगितले आहे. वर्णद्वेष करणे, शिवराळ भाषा वापरणे या घटना खूप व्यथित करणा-या आहेत.