आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Felicitate Niraja For Her Bravery During Terrorist Attack

एक होती निरजा, भारताच्या या युवतीच्या मृत्यूवर रडला होता पाकिस्तान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- निरजा भनोट.)
पेशावरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अवघ्या जगाला धक्का बसला. पाकिस्तानने तर तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. पण तेव्हा केव्हा भारतात आणि पाकिस्तानात दहशतवादी हल्ला होतो तेव्हा एक गोष्ट नेहमी आठवते. ती म्हणजे भारताची युवती निरजा हिची. या युवतीच्या मृत्यूवर पाकिस्तान रडला होता.
ही घटना आहे 28 वर्षे जुनी. वाढदिवसाच्या सुमारे पाच दिवसांपूर्वी 5 सप्टेंबर 1986 रोजी इस्लामिक दहशतवाद्यांच्या तावडीतून तिने तब्बल 360 प्रवाशांना वाचवले होते. परंतु, यात तिला जीव गमावावा लागला. तिच्या साहसाबद्दल पाकिस्तान सरकारने तिला सर्वोच्च नागरिक पुरस्कार दिला आहे. दुसरीकडे भारतानेही अशोकचक्र देऊन तिचा गौरव केला.
चंदिगडची होती निरजा
हरिश भानोत असे तिच्या वडीलांचे नाव आहे. लहानपणापासूनच तिला विमानात बसण्याचे आणि उंचीचे वेड होते. ती मोठी झाली तेव्हा तिने पॅन एम विमान कंपनी जॉईन केली. ती पार्टटाईम मॉडेलिंगही करीत होती. 16 जानेवारी 1986 रोजी निरजा पॅन एममध्ये एअर होस्टेस झाली.
पुढे वाचा काय झाले 5 सप्टेंबर रोजी, ज्यात तिचा जीव गेला....पण वाचले 360 जीव...