आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Girl's Intelegian Capacity More The Eistein

आइनस्टाइनपेक्षाही भारतीय मुलीचा जादा बुद्ध्यांक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमध्ये बारा वर्षे वयाच्या भारतीय वंशाच्या मुलीने बुद्ध्यांक मापन चाचणीत 162 गुण मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिचा आयक्यू म्हणजेच बुद्ध्यांक आइनस्टाइन आणि स्टीफन हॉकिंगपेक्षाही जास्त आहे.

नेहा रामू हिने मेन्सा आयक्यू टेस्टमध्ये तब्बल 162 गुण पटकावले. तिच्या वयोगटात मिळणारे हे सर्वोच्च गुण आहेत. एवढे गुण मिळवून नेहाने ब्रिटनमधील उच्च कोटीच्या बुद्धिवंताच्या यादीत स्थान पटकावले आहे. याचाच अर्थ नेहा भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्यापेक्षाही बुद्धिमान असून या सर्वांचा बुद्ध्यांक 160 च्या आसपास आहे. ‘नेहाने कॅट्टेल आयआयआयबी टेस्टमध्ये 162 गुण पटकावले आहेत. त्यामुळे तिचा समावेश ब्रिटनमधील उच्च कोटीच्या बुद्धिमत्तेच्या एक टक्का लोकांमध्ये समावेश करण्यात आला आहे’, असे ब्रिटिश मेन्साच्या प्रवक्त्याने सांगितले. ब्रिटनमध्ये स्थलांतरित होण्यापूर्वी नेहाचे आई-वडील भारतात राहत होते. त्या वेळी नेहा अवघी सात वर्षांची होती. नेहाचा शाळेमधील परफॉर्मन्स नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. शाळेच्या प्रवेश चाचणीत तिने 280 पैकी 280 गुण मिळवले, तेव्हाच पालकांना तिच्या बुद्धिमत्तेची चुणूक दिसली. आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत नेहालाही वैद्यकीय व्यवसायातच करिअर करायचे आहे. नेहा ही हॅरी पॉटरची निस्सीम भक्त आहे. तिला पोहण्याचाही छंद आहे. मेन्साची चाचणी खूपच कठीण असल्याचे तिने मान्य केले.