आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Government Working On World's Largest Health Insurance Scheme, Says Harsh Vardhan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात येणार सर्वात मोठी आरोग्य विमा योजना, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूस्टन - नरेंद्र मोदी सरकार जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना सुरू करणार आहे. अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या हेल्थकेअर अभियानासारखी ही योजना असेल. या योजनेला ओबामा केअर असेही म्हटले जाते. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हे संकेत दिले आहेत. टेक्सास येथे सेंट अँटोनियोमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन डॉक्टरांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष संदेश पाठवला. त्यातून या महत्त्वाकांक्षी योजनेचे संकेत मिळाले आहेत.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अमेरिकेच्या दौर्‍यात या योजनेचा खुलासा झाला. त्यांनी सांगितले की, देशातील सर्व नागरिकांना या सुदृढ भारत मिशनमध्ये सहभागी करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हर्षवर्धन यांनी मोदींचा संदेश वाचून दाखवताना सांगितले की, ‘मला ठाम विश्वास आहे, आमचे उद्दिष्ट आरोग्य विम्यापेक्षाही पुढचे असेल. आम्हाला आरोग्य सेवांवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यात लोकसहभागाची मोठी भूमिका असेल.’

स्वस्थ इंडिया पोर्टल सुरू
डॉ. हषवर्धन यांनी स्वस्थ इंडिया पोर्टल सुरू केले आहे. त्याच्या माध्यमातून अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे डॉक्टर भारतात त्यांची सेवा देण्यासाठी त्यांच्या पसंतीच्या ठिकाणाची निवड करू शकतील. त्यासाठी एमसीआयच्या नियमांत बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संशोधन व नावीन्यतेवर भर
डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, आमचे सरकार नावीन्यता आणि नवे तंत्रज्ञानाच्या आधारे आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणू इच्छिते. या योजनेची रूपरेषा ओबामा केअरसारखी असेल. योजनेची रूपरेषा ठरवण्यासाठी अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी मदत करावी, भारतातील गोरगरीब, सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सुविधा पुरवल्या जाव्यात, असे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. हर्षवर्धन यांनी केले.

ओबामा केअर काय आहे ?
- अमेरिकेन लोकांना चांगली आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने बराक ओबामा यांनी 2010 मये हेल्थकेअर योजना सुरू केली होती.
- आरोग्य विम्याची गुणवत्ता सुधारणे व त्याचे निर्वहन करण्यायोग्य बनवणे हा याचा उद्देश होता. सर्वसामान्य लोकांच्या आरोग्य सेवेवर होणारा खर्च कमी करणे हाही याचा प्रयत्न होता.
- ओबामा केअरमध्ये 10 मूळ सेवा समाविष्ट आहेत. त्याचा प्रीमियम भरण्यासाठी सरकार लोकांना अनुदान देते.

(फोटो - आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन)