आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीन कार्ड घोटाळ्यात भारतीय ठकसेन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वॉशिंग्टन - एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने ग्रीन कार्ड घोटाळ्यात गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना लावला आहे. सुमारे800 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका अंशू सेठी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सेठी यांनी एक बनावट स्कीम सुरू केली होती. त्याद्वारे चीनसह विविध देशांच्या गुंतवणूकदारांना ठकवल्याचा आरोप सेठी यांच्यावर आहे. शिकागोजवळील ओेहेर भागात हॉटेल आणि कॉन्फरन्स सेंटर उभारण्यात येणार आहे. शून्य कार्बन उत्सर्जन असलेला हा जगातील पहिलाच प्रकल्प असल्याचा दावाही सेठींनी केला होता.