आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइथिओपियातील हजारो लोक शेजारील देशांमध्ये पलायन करत असल्याचे अमेरिकेतील ऑकलँड इन्स्टिट्यूटने केलेल्या संशोधनात आढळून आले, कारण त्यांच्या परवानगीशिवाय त्यांची जमीन विदेशी गुंतवणूकदारांना देण्यात आली आहे. यासंदर्भात ऑक्सफेम संस्थेने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, स्वस्तात जमीन मिळवण्यासाठी गुंतवणूकदार कमकुवत देशांची वाट धरत आहेत. 2000 ते 2011 पर्यंत जगातील 23 कमकुवत देशांनी असे 500 करार केले आहेत दुसर्या ताज्या अहवालानुसार इथिओपियाने भारतीय कंपन्यांना सहा लाख हेक्टर शेती दिली आहे. कराराला विरोध करणारे पत्रकार तसेच राजकीय विरोधकांवर मारहाण, नजरकैद, मुस्कटदाबी करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात आली. अमेरिकतील ऑकलँड इन्स्टिट्यूटच्या मते, भविष्यात परिस्थिती आणखी खराब होऊ शकते, कारण या कंपन्यांनी तेथे कामाला सुरुवात केली आहे आणि तेथील सरकार आणखी 15 टक्के जमिनीचे अधिग्रहण करणार आहे. भारतीय गुंतवणूकदार आणि संस्थांनी ही जमीन विकत घेऊ नये, असे आवाहन करण्यासाठी एक इथिओपियन दल नुकतेच भारतात येऊन गेले. तेथील अधिकार्यांकडून होणारे अमानुष प्रकार रोखण्यात सक्रिय भूमिका बजावण्याची विनंतीही त्यांनी केली. ऑक लँड इन्स्टिट्यूटच्या संचालिका अनुराधा मित्तल म्हटल्या की, भारत सरकार आणि इतर भारतीय कंपन्या स्वत:ला इथिओपियन सरकारच्या मागे लपवू शकत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.