आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय पत्रकाराच्या \'मोबाइल न्यूज सर्व्हिस\'ने पटकावला \'फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन\' अवॉर्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारतीय पत्रकार शुभ्रांशु चौधरी यांनी ब्रिटेनमधील 2014 वर्षांचा 'फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन' (अभिव्यक्ती स्वातंत्र) पुरस्कार पटकावला आहे. सेंसरशिप विरोधात लढणारी संस्था 'इंडेक्स ऑफ एक्स्प्रेशन'ने शुभ्रांशु चौधरी यांना मोबाइल न्यूज सर्व्हिस 'सीजी नेट स्वर'साठी गुरुवारी लंडनमधील बार्बीकन सेंटरमध्ये 'फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या शर्यतीत अमेरिकेचे माजी एनएसए एजेंट एडवर्ड स्नोडेन देखील होते. परंतु, चौधरी हे स्नोडेन यांना वरचढ ठरले. स्नोडेन यांच्यावर अमेरिकेच्या गुप्त माहिती उघड करण्‍याच्या आरोप आहे.

ब्रिटन येथील इंडेक्स ऑफ सेंसरशिप एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. संपूर्ण जगात ही संस्था अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सेंसरशिपसाठी काम करते.

'सीजी नेट स्वर' आहे तरी काय?
शुभ्रांशू चौधरी या 'सीजी नेट स्वर सर्व्हिस'च्या माध्यमातून आदिवासी आणि दुर्गम भागात जावून मोबाइलच्या माध्यमातून बातम्या गोळा करतात. त्यानंतर त्या स्थानिक भाषांमध्ये प्रसारितही करतात. चौधरी यांनी जवळपास 100 ट्रेनी रिपोर्टर्संना ऑडियो न्यूज रिपोटींगची ट्रेनिंगही दिली. त्यानंतर या बातम्या वेबसाइटवर अपलोड केल्या जातात.

इंडेक्स ऑफ एक्सप्रेशन ही संस्था अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे रक्षण करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करते.

400 जणांमधून 17 जण नामांकित
'इंडेक्स ऑफ एक्सप्रेशन'ने 400 जणांच्या यादीतून केवळ 17 जणांना शॉर्टलिस्ट केले. जनमत चाचणीच्या माध्यमातून 'डिजिटल फ्रीडम अवॉर्ड'साठी चौधरी यांची निवड करण्‍यात आली आहे.