आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Kidnapping News In Marathi, Iraq, Divya Marathi, Sunni Terrorist Organization

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकमध्‍ये दहशतवाद्यांना गुंगारा देत भारतीय निसटला,16 भारतीयांना सुरक्षित ठिकाणी हलवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद/ नवी दिल्ली - सुन्नी संघटनेच्या मोसूलमध्ये ताब्यात असलेल्या 40 पैकी एका भारतीयाला तावडीतून पळ काढण्यात यश मिळाले आहे. त्याचबरोबर हिंसाचार सुरू असलेल्या भागातील 16 भारतीयांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक झाली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासूनच्या हिंसाचारामुळे इराकची परिस्थिती आणखी चिघळली. शुक्रवारी इराकच्या शिया सरकारवर अंतर्गत पातळीवर टीका झाली. उत्तरेकडील ताल अफर शहरावर बंडखोरांनी ताबा मिळवला.

9 जूनपासून देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांवर आयएसआयएल या सुन्नी संघटनेने जोरदार चढाई करून कब्जा मिळवला. ताल अफर शहरावरदेखील शुक्रवारी कब्जा करण्यात आला. त्या वेळी झालेल्या धुमश्चक्रीत इराकच्या पोलिसांना बंडखोरांचा पाडाव करण्यात यश मिळाले नाही. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची इराकप्रश्नी ठोस निर्णय घेण्याची इच्छा दिसत नाही, असा आरोप इराणकडून करण्यात आला आहे.