आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Man Jailed In New Zealand For Biting Ear Off Former Partner's Boyfriend

मैत्रिणीच्या प्रियकराच्या कानाचा लचका तोडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबोर्न - मैत्रिणीने संबंध तोडल्यामुळे संतापलेल्या एका भारतीय वंशाच्या तरुणाने तिच्या प्रियकराच्या कानाचा चावा घेऊ न लचका तोडल्याची घटना न्यूझीलंडमध्ये घडली.या तरुणाने आपल्या मैत्रिणीलाही सोडले नाही, जाता जाता तिच्याही तोंडावर जोरदार ठोसा मारला होता. या गुन्ह्याबद्दल त्याला आता दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

लचका घेणार्‍या मजनूचे नाव अनिश राव असून त्याच्या मैत्रिणीचे नाव विकाश्नी अशारी आहे. विकाश्नीच्या प्रियकराचे नाव रितेश राम आहे. विकाश्नी ही अनिशची पूर्वाश्रमीची प्रेयसी. पण सध्या विकाश्नी आणि रितेश दोघेही एकत्र राहतात. गतवर्षीची ही घटना. अनिश रामच्या घरात शिरला. दोघे झोपेत असताना त्याने रितेशच्या कानाच्या वरच्या भागाचा कडाडून चावा घेतला. लगोलग प्रेयसीच्या तोंडावर ठोसा लगावला होता.

(फोटो - अनिश राव)