आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Nurses In Iraq Safe, \'forcibly\' Moved To Another Location: Govt

46 परिचारिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार इराकला Boeing 777 पाठवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराकच्या तिक्रितमधून मोसूलला बळजबरीने नेलेल्या 46 परिचारिकांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. रेड क्रॉसने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, त्यांना मायभूमीवर परत आणण्यासाठी भारत सरकार Boeing 777 पाठवणार आहे. सर्व परिचारीका सुरक्षित असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री ओमन चॅंडी यांनी दिली आहे.
गुरुवारी या सर्वांना एका वाहनाने नेण्यात आले होते. पण त्यांना नेमके कोणत्या ठिकाणी हलवण्यात आले हे मात्र स्पष्ट झाले नाही, परंतु प्रवासादरम्यान अनेक नर्स जखमी झाल्याची माहिती मिळाली होती.

गेल्या काही दिवसांपासून या परिचारिका तिक्रितमधील एका रुग्णालयात अडकल्या होत्या. त्यापैकी दोन परिचारिकांनी याबाबतची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली. परिचारिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी त्यांच्या रुग्णालयासमोर दोन बस येऊन उभ्या राहिल्या. सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी रेडक्रॉस संघटनेचे कार्यकर्ते असावेत, असे त्यांना वाटले होते.

तिक्रितमध्ये राहण्याचा सल्ला
इराकी लष्कर कधीही तिक्रितवर हल्ला करू शकते, त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत चला, असा त्यांचा आग्रह होता. मात्र, परिचारिकांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असता, भारतीय अधिकार्‍यांनी त्यांना तिक्रितमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार त्या अनेक दिवस तिक्रितमध्येच होत्या. परंतु त्यांना एका वाहनाने दहशतवाद्यांनी हलवले.

इराकी लष्करही आक्रमक
तिक्रितमध्ये या 46 परिचारिका एका रुग्णालयाच्या तळघरात दबा धरून बसल्या आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना पळवून लावण्यासाठी इराकी लष्कर आजूबाजूच्या परिसरात बॉम्बस्फोट करत आहेत. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर तिक्रितमध्ये काही प्रमाणात शांततेचे वातावरण आहे.

चंडी-स्वराज भेट
इराकमध्ये अडकलेल्या बहुतांश नर्स या केरळमधील आहेत. त्यांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी केली आहे. गुरुवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. त्यात त्यांनी स्वराज यांना ही विनंती केली. इराकमध्ये संकटग्रस्त भागातील नर्स आमच्या संपर्कात आहेत. त्यांना परत आणण्यासाठी योग्य प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली. उभय नेत्यांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली.

अनेक दिवस रुग्णालयातच!
आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी भारतीय नर्सना रुग्णालयातच ठेवले होते. या महिलांना सुरक्षित ठेवण्यात आले होते . त्यांना जीवनावश्यक सुविधाही कमी पडू दिल्या जात नव्हत्या. सदर महिलांना अनेक महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता.

(फोटो - एकेकाळी सरकारी फौजांशी संघर्ष करणारे शिया सैन्य आता मात्र सरकारी फौजांसोबत सुन्नी दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी सक्रिय आहे)