छायाचित्र: गॅरी पीटर्स यांच्या समर्थनार्थ प्रचारात उतरलेले राष्ट्रपती बराक ओबामा.
वॉशिंग्टन - मंगळवारी अमेरिकेत अत्यंत प्रतिष्ठित निवडणूक होत आहे. कनिष्ठ सभागृह मानल्या जाणा-या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या ४३५ सदस्यांची यात निवड होत असून यासोबतच सिनेटच्या १०० पैकी ३६ जागांसाठी मतदान होईल. याशिवाय देशातील ५० पैकी ३५ राज्यांतील सिनेटर्सही निवडले जाणार असून या निवडणुकीच्या रिंगणात भारतीय वंशाचे ३० नेते उतरले आहेत. अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांची संख्या ३० लाख आहे.
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजसाठी निवडल्या जाणा-या प्रतिनिधींचा कार्यकाळ दोन वर्षांचा, तर सिनेट सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. प्रशासकीय व्यवस्थेनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी या जागांसाठी मतदान होते. सिनेटमध्ये राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या डेमोक्रॅट्सडे बहुमत (५३ जागा) असून हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये रिपब्लिकन्स बहुमतात (२३३) आहेत. गेल्या निवडणुकीत डेमोक्रॅट्स फार प्रभाव दाखवू शकले नव्हते. त्यामुळे कनिष्ठ सभागृहात ओबामा केअरसारख्या योजनांना विरोध करून रिपब्लिकन्सनी ओबामा सरकारला अडचणीत आणले होते. ही योजना चालू ठेवण्याच्या दृष्टीने व भविष्याच्या दृष्टीने ही निवडणूक ओबामा यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे.
भारतीय वंशाचे सदस्य
* अॅमी बेरा (कॅलिफोर्नियातून दुस-यांदा विजयी)
* रोहित खन्ना (सिलिकॉन व्हॅली)
* मनन त्रिवेदी (पेनसिल्वेनियातून तिस-यांदा विजयी)
* अर्विन वोहरा (मेरिलँड)
* याशिवाय रिपब्लिकन पार्टीचे ९ आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे १० उमेदवार भारतीय वंशाचे आहेत.
* कमला हॅरिस या कॅलिफोर्नियातून अॅटर्नी जनरल पदासाठी पुन्हा निवडणूक मैदानात आहेत.
गव्हर्नर पदासाठी भारतीयांची दावेदारी
* रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार निकी हॅली साऊथ कॅरोलिनाच्या गव्हर्नरपदासाठी दुस-यांदा निवडणूक लढवत आहेत.
* रिपब्लिकन पार्टीतूनच नील काशकारी कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदासाठी शर्यतीत आहेत.