आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Origin Halima Yakub First Women Speaker Singapore Parliament

भारतीय वंशाच्या हलिमा सिंगापूर संसदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - भारतीय वंशाच्या नेत्या हलिमा याकूब यांनी इतिहास रचला आहे. सिंगापूर संसदेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. हलिमा यांची मायकेल पाल्मर यांच्या जागी निवड झाली आहे. पामर यांना विवाहबाह्य संबंधांमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. न्यू एशिया वाहिनीच्या वृत्तानुसार, हलिमा यांनी दुपारची बैठक सुरू होताच पदभार स्वीकारला. पाच अपत्यांची आई असणार्‍या 58 वर्षीय हलिमा यांनी याआधी कुटुंब कल्याण मंत्री म्हणून काम केले आहे. पीपल्स पार्टीच्या खासदार पाल्मर यांनी 12 डिसेंबर 2012 रोजी संसद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.