आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Peacekeepers Injured In South Sudan News In Marathi

सुदानमध्ये बंडखोर आदिवासींच्या हल्ल्यात 20 ठार, दोन भारतीय शांती सैनिक जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खारतोअम (सुदान)- दक्षिण सुदानमध्ये बंडखोर आदिवासी समुदायाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या तळावर केलेल्या भीषण हल्ल्यात 20 जण मृत्युमुखी पडले असून दोन भारतीय शांती सैनिकांसह 70 जण जखमी झाले आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या दक्षिण सुदानमधील तळावर सुमारे 5,000 नागरिकांना निवारा देण्यात आला आहे. त्यांच्यावर विरोधी पक्षाच्या आदिवासींनी काल जोरदार हल्ला चढवला. यावेळी मोठी धुमश्चक्री उडाली. त्यानंतर शांती सैनिकांनी गोळीबार करीत हल्ला करणाऱ्या आदिवासी समुहाला पळवून लावले. तरीही या हल्ल्यात 20 नागरिक ठार झाले असून दोन भारतीय शांती सैनिकांसह 70 जण जखमी झाले आहेत.
गेल्या चार महिन्यांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात काल झालेला हल्ला सर्वांत मोठा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काल झालेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रसंघाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शस्त्रधारी आदिवासी समुहांनी इतर समुहांना टार्गेट करणे अमानवीय आहे, असे म्हटले आहे.