आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian President Pranav Mukherjee On Bangaladesh Tour

राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी बांगलादेश दौर्‍यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- बांगलादेशचे भवितव्य येथील तरूणांची हाती आहे. त्यामुळे तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्याचे विस्मरण होऊ देऊ नये, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले आहे.
मुखर्जी शनिवारी बांगलादेशच्या दौर्‍यावर दाखल झाले. त्यांचा दौरा रविवारपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने ढाका येथे मीडियाशी बोलताना त्यांनी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तरूणांना हे आवाहन केले. देशाचे स्वातंत्र्य अनेकांच्या समर्पणातून मिळाले आहे. त्यामुळे युवकांनी जागृत झाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. 1971 च्या स्वातंत्र्य युद्धात भारताने बांगलादेशला खंबीरपणे साथ दिली. जेवढी मदत करता येईल, तेवढी भारताने केल्याचे स्मरण मुखर्जी यांनी यावेळी केले. दरम्यान, 1971 च्या युद्धातील दोषी कट्टरवादी नेत्याला दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरुद्ध देशात हिंसाचार सुरूच आहे. जमात-ए-इस्लामी संघटनेचा नेता दिलावर हुसैन सईदी (73) यास शिक्षा ठोठावल्याच्या तिसर्‍या दिवशी झालेल्या हिंसाचारात 5 ठार झाले. हिंसाचारातील मृतांचा आकडा आता 57 वर पोहोचला आहे.