आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Prime Minister Narendra Modi Speech In Allphones Arena At Sydney

सिडनीत भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद, ऑस्ट्रेलियात \'मोदी मोदी\'च्या घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- सरकारच्या भरवशावर देश चालू शकत नाही. त्यासाठी जनतेला पुढाकार घेण्याची संधी दिली पाहिजे. मग यात शासन आडकाठी ठरू नये, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियात सिडनीचे अलफोन्स एरिना गाजवले. अमेरिकेत न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअरवर ज्या उत्साहान भारतीय वंशाच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले होते अगदी तसाच उत्साह अलफोन्स एरिनामध्ये होता. मोदी... मोदीच्या घोषणाबाजीने मैदान दुमदुमले.

सुमारे १ तास १२ मिनिटे मोदींनी या वेळी भाषण केले. प्रथमच सरकारबाबत आपली भूमिका जाहीरपणे मांडली. प्रवासी भारतीयांसाठी पीआयओ (पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन) आणि ओसीआय (ओव्हरसिज सिटीझन ऑफ इंडया) कार्ड एकत्रित करण्याचे आश्वासन मोदींनी अमेरिकेत दिले होते. सिडनीत त्यांनी ही प्रक्रिया अहमदाबादेत ७ जानेवारीला होत असलेल्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी हमी दिली.

मोदी म्हणाले...
>देवाने तुम्हाला भरभरून दिले आहे. आता तुम्ही योगदान द्या.
>आपल्या मूळ गावांकडे लक्ष द्या, स्वच्छतागृहे बांधा.
>पूर्वजांच्या गावांत लोकांना सुविधा उपलब्ध होतील हे बघा.
>पर्यटकांनी भारतात अधिक संख्येने यावे म्हणून देश स्वच्छ कसा राहील याकडे लक्ष द्या.

सरकार काय करेल?
>सरकारच्या भरवशावर देश चालू शकत नाही.
>जनतेने पुढाकार घ्यावा. शासनाची आडकाठी नाही.
>पर्यटकांना भारतात पोहचल्यावर व्हिसा.
>पीआयओ आणि ओसीआय ७ जानेवारीपर्यंत एकत्र करणार.

ऑस्ट्रेलियातील व्यावसायिकांसाठी
>माझे सरकारने भारतात उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी मेक इन इंडया अभियान सुरू केले आहे. यासाठी मदत करा.
>रेल्वेमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणुकीचा मार्ग आता खुला झाला आहे
>रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये ऑस्ट्रेलियातील कंपन्यांनी गुंतवणूक करावी. >तुमच्यासाठी भारत सरकार आपली धोरणे अधिक पारदर्शक करेल.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो...