आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाहोर- हेरगिरीच्या आरोपात लाहोर तुरुंगात कैदेत असलेल्या चमेल सिंग नावाच्या एका भारतीय कैद्याचा जबर मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. चमेल सिंग लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात होता. त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षा लवकरच पूर्ण होणार होती. परंतु, दोन दिवसांपूर्वी त्याला तुरुंगातील अधिका-यांनी निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर त्याला लाहोरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
पाकिस्तानी सैन्याकडून दोन भारतीय सैनिकांची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून पाकिस्तानी सरकार अजुनही गंभीर झालेले दिसत नाही. प्राप्त माहितीनुसार, या तरुंगातून तहसीन खान नावाच्या वकीलांची सुटका झाली होती. त्यांनी चमेल सिंगला 15 जानेवारी बेदम मारहाण झाल्याचे सांगितले. चमेल सिंग त्यावेळी कपडे धुवत होता. त्याला मारहाण करातना तुरुंगातील कर्मचारी भारतीय तसेच अल्पसंख्यांकांबद्दल वर्णद्वेषी शिविगाळ करीत होते.
याच तुरुंगात सरबजित सिंगला ठेवण्यात आले आहे. खान यांच्या मते त्याच्या जीवालाही धोका आहे. त्याच्याशिवाय इतर भारतीय कैदीही जीव मुठीत घेऊन जगत असल्याचे खान यांनी सांगितले.
भारतीय अधिका-यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून 15 जानेवारीला एका कैद्याचा लाहोरमध्ये मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु, मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आले नव्हते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.