आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Rating Decreased From Category 1 To Category 2

मलेशियापेक्षाही असुरक्षित आहेत भारतीय विमानसेवा; जाणून घ्या, अन्य देशातील स्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलेशियन एअरलाइन्सचे विमान MH370 हे रहस्यमय बेपत्ता होऊन तब्बल तीन आठवडे उलटली आहेत. मलेशियासह अन्य 24 देशांनी मोठी शोधमोहीम उघडूनही अद्याप या विमानाचा शोध लागलेला नाही. सुरुवातीला हे विमान हायजॅक झाले असावे असा तर आता या विमानाचा अपघात होऊन त्याला हिंदी महासागरात जलसमाधी मिळाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विशेष म्हणजे बेपत्ता झालेल्या MH370 या विमानाचा वापर करून दहशतवादी भारतावरही 9/11 सारखा हल्ला MH370 चा वापर केला जाऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकेचे माजी राजनैतिक अधिकारी स्ट्रोब टेल्बोट यांनी
वर्तवली होती.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर यूएस फेडरल एव्हिऐशन अॅडमिनिस्ट्रेशनद्वारा (FAA) देण्यात आलेला अहवाल अतिशय धक्कादायक आहे.

मलेशियन एअरलाइन्स सुरक्षित...
यूएस फेडरल एव्हिऐशन अॅडमिनिस्ट्रेशनद्वारा (FAA) देण्यात आलेला अहवाल 31 जानेवारी, 2014 रोजी इंटरनॅशनल एव्हिएशन सेफ्टी असेसमेंट प्रोग्रामच्या हवाल्याने (IASA) प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालात मलेशियाला कॅटेगरी-1 मध्ये स्थान देण्यात आले आहे. अर्थात मलेशियन एअरलाइन सुरक्षित असून अन्य नियमांचे पालन व्यवस्थितरित्या केले जाते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, भारताची अवस्था पाकिस्तानपेक्षाही गंभीर...