आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानात भारतीय वंशाचा झेंडा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर/मेलबर्न- जगभरात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून आजवर भारतीय पताका फडकावत ठेवली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानातही नवा इतिहास घडला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंजाब प्रांतीय विधानसभेत नामनिर्देशित सदस्य म्हणून सरदार रमेशसिंग अरोरा यांची निवड झाली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये इस्रायलचे राजदूत म्हणून देवानंद ऊर्फ देव शर्मा यांना नेमण्यात आले आहे.

37 वर्षीय शर्मा ठरले सर्वांत तरुण राजदूत
भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियातील मुत्सद्दी 37 वर्षीय देवानंद शर्मा यांनी देशाचे सर्वांत तरुण राजदूत होण्याचा मान मिळवला. या पदापर्यंत पोहचणारे ते दुसरे भारतीय मुत्सद्दी आहेत. यापूर्वी भारतात ऑस्ट्रेलियाचे राजदूत पीटर वर्गीस यांची नियुक्ती करण्यात आली होती. केनियामध्ये एका मल्याळी कुटुंबात वर्गीस यांचा जन्म झाला होता. व्हँकोव्हरमध्ये जन्मलेले देव शर्मा 1979 मध्ये सिडनीमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर त्यांची वाटचाल अत्यंत प्रभावी राहिली. मध्य-पूर्वेबाबत ऑस्ट्रेलियन लोकांची धारणा बदलण्याबरोबरच ऑस्ट्रेलियाबद्दल तेथील लोकांचे मत बदलण्याचाही प्रयत्न करू, असे शर्मा यांनी सांगितले.
पत्नी रशेल आणि तीन मुलींसह ते लवकरच इस्रायलला रवाना होतील.

उजळ कारकीर्द
० वॉशिंग्टनमध्ये वकिलातीमध्ये कौन्सिलर.
० 2004-06मध्ये परराष्टÑमंत्र्यांचे सल्लागार.
० देशाच्या परराष्टÑ संबंधी विभागात पहिले सहसचिव