आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Scholar Develops Street Lights With Sensors

भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने बनवले सेन्सरयुक्त पथदिवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - नेदरलँडच्या डेल्फ विद्यापीठात शिकत असलेल्या चिंतन शाह या भारतवंशीय विद्यार्थ्याने सेन्सरयुक्त पथदिवे तयार केले आहेत. जेव्हा या दिव्यांजवळून एखादी व्यक्ती, सायकल किंवा कार जाईल तेव्हाच हे पथदिवे सुरू होतील. इतरवेळी मात्र त्याचा प्रकाश आपोआप मंद होऊन जाईल.

या पथदिव्यांसाठी चिंतनने वायरलेस सेन्सर तंत्राचा वापर केला असून आजूबाजूला एखादी व्यक्ती आली तर हे सेन्सर सर्किटला जोडून टाकते आणि दिवा प्रकाशमान होतो. इतकेच नव्हे तर मांजर, कुत्रा किंवा उंदीरासारख्या प्राण्यांना टाळण्याचीही या पथदिव्यात सुविधा करण्यात आली आहे. शाहने पथदिव्यांसाठी येणार्‍या खर्चाबाबत एक संशोधन केले असता युरोपमध्ये पथदिव्यासाठी लागणार्‍या विजेसाठी 13 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले जात असल्याचे त्याला आढळून आले. ही सिस्टम लावल्यानंतर ऊर्जा बचत आणि कार्बन डायऑक्साईन उत्सर्जन 80 टक्क्यांपर्यंत कमी होऊन जाईल तसेच देखभालीवर येणारा खर्चसुद्धा 50 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकतो असा दावा शाहने केला आहे.