आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय शास्त्रज्ञाने तयार केला रोबोटचा मेंदू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेतील मूळ भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. जगन्नाथन सारंगपाणी यांनी रोबोटचा मेंदू विकसित केला आहे. ही एक नवी फीडबॅक प्रणाली असून यामुळे कमी देखरेखीखाली रोबोट उत्तम कामगिरी करू शकणार आहे. ‘मिसुरी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’चे डॉ. सारंगपाणी यांनी या रोबोटचा वापरही केला आहे. हा रोबोट त्याच्यावर सोपवलेली कामगिरी बजावत असताना स्वत:ची क्षमता स्वत:च वाढवतो. नव्या फीडबॅक प्रणालीत आघाडीवर असलेल्या रोबोटमधील प्रणाली नादुरुस्त झाली तर मागून येणारा दुसरा रोबोट स्वत:हून नेतृत्व स्वीकारतो.

रोबोट काय करेल?
रोबोटसारखी यंत्रे स्वत:हून काम करू शकतील. एकदा रोबोटवर काम सोपवले की मग विसरून जा. तो ते पूर्णच करेल. त्याच्यावर देखरेख करण्याची गरज नाही. काही अडचणी आल्या तर फॉल्टकंट्रोल डिझाइननुसार दुसरा रोबोट पहिल्याची जागा घेईल.

फिडबॅक प्रणाली म्हणजे?
कल्पना करा की, वेगवेगळ्या ठिकाणी काम करणार्‍या दहा बुलडोझरना तुम्ही हाताळत आहात. यातील एक नादुरुस्त झाला तर हा रोबोट काम थांबू देणार नाही. पर्यायी व्यवस्था तो करेल.

उपयोग कोणत्या क्षेत्रात?
फिडबॅक प्रणालीचा वापर संरक्षण, खाण, हवाई क्षेत्रात होईल. विमानांत याचा उपयोग होऊ शकेल. मोठा तांत्रिक बिघाड झाला तर पर्यायी व्यवस्था झाल्याने अपघात टळतील.

तंत्रज्ञान: फॉल्टकंट्रोल डिझाइननुसार दुसरा रोबोट पहिल्याची जागा घेईल, बिघाड आपोआप दुरुस्त होणार

रोबोटनी स्वत:हून विचार करावा
रोबोटने स्वत:हून विचार करावा, सूचनेची वाट न पाहता निर्णय घ्यावेत, अशी माझी इच्छा आहे. एखाद्या गोष्टीचे त्यांनी स्वत:हून विश्लेषण करावे, असा रोबोटचा विकास घडवायचा आहे. स्वत: निर्णय घेणारे हे रोबोट लवकरच जगात अवतरतील.
- डॉ. जगन्नाथन सारंगपाणी