आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Scientists Win 3 Gold Medals In Chemistry Olimpiad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये भारतीय वैज्ञानिकांची सुवर्ण कामगिरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- 44 व्या आंतरराष्ट्रीय केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये भारतीय टीमने तीन सुवर्ण आणि एक रजकपदक जिंकले आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी अजूनपर्यंत थोडीशी नरमगरम असली तरी केमिस्ट्री ऑलिम्पियाडच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. 1999 पासून भारताने या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली.
21 ते 30 जुलैदरम्यान मेरीलँड विद्यापीठात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात 72 देशांतील 283 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सायन्स ऑलिम्पियाडचे राष्ट्रीय समन्वयक विजय ए. सिंह यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भोपाळचा शुभम चांडक, कोलकात्याचा दीप तारक हैत, मुंबईच्या मानव अवलानी या तिघांनी सुवर्णपदके पटकावली आहेत, तर जयपूरच्या निमितसिंहने रजतपदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय केमिस्ट्री ऑलिम्पियाडतर्फे 1968 पासून या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
मुंबईतील होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च नोडल सेंटरमधून भारतीय टीमची निवड करण्यात येते. यावर्षीच्या केमिस्ट्री ऑलिम्पियाडमध्ये भारतातील 35 हजार 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.